
ग्राम पंचायतीने लक्ष देण्याची गरज!
संदेश क्रा़ंती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील इदलहोंड ग्राम पंचायत हद्दीतील अंकले इदलहोंड जोड रस्त्यावर जागोजागी खड्डयाचे साम्राज्य पसरले आहे.
त्यामुळे अंकल्याहुन इदलहोंड जाणार्या प्रवासाना यांचा खुपच त्रास नागरीकाना होत आहे.
गणेबैल टोलनाका चुकविण्यास पर्यायी रस्ता!
पणजी बेळगाव महामार्गावरील गणेबैल येथील टोलनाका चुकविण्यास चार चाकी वाहणाना अंकले इदलहोंड रस्ता सोयीचा आहे. मात्र रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहन धारक याकडे पाठफिरवत आहेत.
तरी सुध्दा अंकले इदलहोंड रस्ता सोयीचा आहे .तेव्हा इदलहोंड ग्रामपंचायतीने या रस्त्याची डाग डुजी करावी .अशी मागणी इदलहोंड ,माळ अंकले ,झाड अंकले आदी गावच्या नागरीकांतुन होत आहे.
सध्या अंकले इदलहोंड रस्त्यावर खड्डेच खड्डे!
अंकले इदलहोंड याजाड रस्त्यावर जागोजागी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. यारस्त्यावरून वीटा ,वाळुच्या ट्रका ही येत असतात.त्यामुळे रस्ता अतिशय खराब झाला आहे.याकडे ग्राम पंचायतीने लक्ष देणे गरजेचे आहे.