# माजी आम.शिक्षणतज्ञ गुरूवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी व इतर मान्यवरांच्याहस्ते सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
फुलेवाडी (डुक्करवाडी) (ता.खानापूर) गावचे सुपूत्र कुंभारकलाकार पुंडलिक एम.कुंभार यांच्या ” मार्डन पाॅटरी अँड टेराकोटा आर्टस” मधील त्याच्या अतुलनिय कामगीरीबद्दल त्याच्या शारीरिक आव्हाने असुन ही त्याच्या कठोर परिश्रम ,दृढनिश्चय आचिकाटी यामुळे त्याच्या या कार्याचे कौतुक म्हणून लोकप्रिया जनसेवा संस्थेचा फिजिकली चॅलेंज पुरस्कार सोहळा २०२५ प्रदान करण्यात आला.
बेळगाव शहापूर येथील सरस्वती रोड, नाथ पै सर्कल जवळील लोकप्रिया जनसेवा संस्था येथे रविवारी दि.२३ रोजी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अतिथी म्हणून सौ ज्योत्स्ना पै. व्यवस्थापकीय संचालक पै बेकरी, डाॅ.सुरेश कुलकर्णी अध्यक्ष इंडियन रेड क्राॅस सोसायटी, युवराज कदम माजी चेअरमन बुडा,आणि एपीएमसी बेळगाव.ल
आमचे प्रेरणास्थान माजी आमदार व शिक्षणतज्ञ गुरूवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी,तसेच प्रसिडेंट गजानन साबन्नावर ,व्हा.प्रसिडेट प्रशांत एन .हुंदरे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत करून करण्यात आले.
यावेळी उपस्थित पाहुण्याच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी कुंभार कलाकार यांचा माजी आमदार व शिक्षणतज्ञ गुरूवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रशस्ती पत्र ,मानचिन्ह ,फेटा व म्हैसुर हार ,भेटवस्तू देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरानी कुंभारकलाकार पुंडलिक कुंभार यांच्या कार्याचे कौतुक करून त्याना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पुंडलिक कुंभार म्हणाले मी लहानपणा पासूनच गणपतीच्या मुर्त्या करत होतो. त्यामुळे पॉटरेट आणि टेरा कोटा हे मला शिकायला आधी सोपे जात होते. त्यामुळे टेरा कोटा आर्ट मध्ये मी वेगवेगळे नेटवर डिझाईन पाहून करत होतो
बाहेर देशामध्ये काय चालते कोणते पाॅट डिझाईन चालतात हे सुद्धा मी नेटवर्क सर्च करून ते बनवण्याचा प्रयत्न करत होतो.
.सात वर्षांपूर्वी मी हा पॉटरी व्यवसाय सुरू केला आणि यामध्ये आम्ही वेगवेगळ्या असे चेहरे मास्क वेगवेगळ्या देवतांचे मूर्ती महापुरुषांच्या मूर्ती असे एक वेगळेच कला करत गेलो आणि या आमच्या कलेला लोक भरभरून प्रतिसाद देत होते.
त्यामुळेच आज लोकप्रिया जनसेवा संस्थेकडुन फिजिकल चॅलेेज पुरस्कार प्राप्त झाला.असे मत व्यक्त केले.
यावेळी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.