
ऋषीपंचमी (उंदरीच्या )सनासाठी हलकर्णीच्या मर्याम्मामंदिरा समोर बकर्याचा भरला बाजार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
सालाबाद प्रमाणे गणपती सनाच्या दुसर्या दिवशी ऋषीपंचमीच्या (उंदीरच्या ) सनासाठी खानापूर जवळील हलकर्णीच्या मर्याम्मादेवी मंदिरासमोरील माळजागेवर रविवारी दि.१ सप्टेंबर रोजी बकरीचा बाजार भरला.
या बकरीच्या बाजारात खानापूर तालुक्यतील उचवडे,बैलूर मोदेकोप, नंदगड, पारिश्वाड,कान्सुली, चापगांव ,जांबोटीसह गवळी वाड्यावरील बकर्या बरोबर गोकाक, रायबाग आदी भागातील बकरी विक्रीसाठी आली होती.
बकर्याची किंमती ५ हजारापासुन ६० हजार पर्यत!
आजच्या बकर्यांच्या बाजारात पाच हजार रूपया पासुन साठ हजार रूपया पर्यत बकर्याची किमंती वाढल्या होत्या.
आजच्या बाजारात जास्तीत जास्त मेंढा खरेदीवर भर दिला होता. त्याचबरोबर पालवा खरेदीसाठी लोकानी गर्दी केली होती.
बकरी खरेदी साठी तालुक्यातील गर्लगु़ंजी भागातुन,जांबोटी भागातुन , लोंढा नंदगड भागातुन पारिश्वाड इटगी भागातुन नागरीक मोठ्या संख्येेने गर्दी केली होती.
यंदा गणेश चतुर्थी शनिवारी दि.७ सप्टेंबर रोजी आल्याने दुसर्याच दिवशी म्हणजे रविवारी दि. ८ रोजी ऋषीपंचमी आहे.
त्यामुळे आजच्या रविवार दि १ सप्टेंबरचा बकर्याचा बाजार मोठ्याप्रमाणात भरला आहे.