
२० सप्टेंबर तिसर्यादा सुनावणी!
नगरसेवक लक्ष्मण मादार घेतली स्थगिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष पदासाठी २६ आँगष्ट निवडणणुक जाहिर करण्यात आली होती.
सदर नगराध्यक्ष ,उपनराध्यक्ष पद हे सामान्य महिला करिता होते.मा त्र नगरसेवक लक्ष्मण मादार यानी आरक्षणावरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने निवडणुकीला तात्पुरती स्थगिती दिली. व या याचिकेवरील सुनावणी २९ रोजी होणार होती .
मात्र उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशानी या प्रकरणी पुढील सुनावणी ११ सप्टेंबर पर्यत पुढे ढकलली.त्यामुळे नगराध्य व उपनगराध्य पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकाना ११ सप्टेंबर पर्यत प्रतिक्षा करावी लागली.
परंतू आज बुधवारी ता ११ सप्टेंबर रोजी सुनावणी न होता .पुन्हा तिसर्यादा सुनावणी येत्या २० सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
, ता .२६ आँगष्ट रोजी होणार्या निवडणुकीची मोठी चुरस लागुन होती.
मात्र २६ आँगष्ट पूर्वीच नगरसेवक लक्ष्मण मादार यानी दाखल केलेल्या या याचिके मुळे तीन वेळी सुनावणीच्या तारखा पडल्या. त्यामुळे नगराध्यक्षाच्या स्वप्नात असलेल्या नगरसेवकांच्या स्वप्नावर पाणी सोडावे लागणार की काय ? असा प्रश्न नगरसेवकाना पडला आहे.
नगरपंचायतीच्या नगराध्यपदाची सुत्रे विकासासाठी होणार कधी.
मागील वेळी केवळ सहा महिन्यासाठी नगरध्यक्षाची माळ नगरसेवकाच्या गळ्यात पडली.मात्र शहराचा विकास किती झाला. आता आडीज वर्षाच्या येणार्या काळासाठी खानापूरच्या शहरासाठी किती विकास साधणार हे येणार काळच सांगणार.
त्यामुळे खानापूर शहरवासीयाना विकासाबाबत संशयच आहे.