#अध्यक्षा डाॅ. राजश्री नागराजू यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
म. मं. बेळगाव संचलित खानापूर येथील मराठा मंडळ हायर सेकंडरी हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन हायस्कूलच्या सभागृहामध्ये नुकताच मोठ्या उत्साहाने संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडलच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर श्रीमती राजश्री नागराजू उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून हायस्कूलचे माजी विद्यार्थी जय जवान जय किसान या संघटनेचे अध्यक्ष गोविंद पाटील हे होते. यावेळी मराठा मंडळ संस्थेचे ज्येष्ठ संचालक परशराम अण्णा गुरव व शिवाजीराव पाटील शाळेचे मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते .
इशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर विद्येची देवता सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. या समारंभाचे अध्यक्ष स्थान भूषवीत असलेल्या मराठा मंडळाच्या कार्यतत्पर अध्यक्ष डॉक्टर राजश्री नागराजू यांच्या कार्याचा ओघवता परिचय हायस्कूलचे सहशिक्षक जे डी बिरजे यांनी करून दिला व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते डॉक्टर राजश्री नागराजू यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गोविंद पाटील यांच्या कार्याचा परिचय सहशिक्षक पी जी हलगेकर यांनी करून दिला.
सर्व उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले मराठा मंडळ शिक्षण संस्था ही बहुजन हिताय बहुजन सुखाय हा दृष्टिकोन समोर ठेवून सन १९३१ मध्ये स्थापन करण्यात आली या चिमुकल्या रोपट्याचा आज विशाल काय वटवृक्ष झाला आहे व आज एका विद्यापीठाचे रूप या संस्थेला प्राप्त झाले आहे अनेक शैक्षणिक दालनातून हजारो विद्यार्थी पदवीधर होत आहेत याचे संपूर्ण श्रेय संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी श्रीमान नाथाजीराव गुरु अण्णा हलगीकर यंंना जाते. त्यांचा आदर्श व त्याग समोर ठेवूनच मी या संस्थेची पुढील वाटचाल करीत आहे असे विचार डॉक्टर राजश्री नागराजू यांनी व्यक्त केलेआणि म्हणूनच २०३६ मध्ये भारतात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत मराठा मंडळ चे विद्यार्थी सहभागी होतील हे ध्येय समोर ठेवून विविध खेळांसाठी लागणारे क्रीडांगण जलतरण तलाव यांची युद्ध पातळीवर निर्मिती सुरू केली आहे. यासाठी मराठा मंडळ किणये हायस्कूलच्या पटांगणावर पूर्वतयारी सुरू आहे असे विचार डॉक्टर राजश्री नागराजू यांनी व्यक्त केले त्या मराठा मंडळ हायस्कूलच्या स्नेहसंमेलन समारंभाच्या अध्यक्ष स्तनावरून बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे गोविंद पाटील व हायस्कूलचे मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी यांची भाषणे झाली. यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य नाटक यांची रेलचेल केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती एल जी जाधव तर सूत्रसंचालन श्रीमती एस बी भातकांडे यांनी केले शेवटी श्रीमती रेखा लक्केबैलकर यांनी सर्वांचे आभार मानले.