
खानापूर म ए समितीची घेतली दखल!
तालुक्यातील मराठी भाषिकातुन समाधान!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील माता व बाल रूग्णालयाच्या नुतन इमारतीचा उदघाटन सोहळा बुधवारी दि ११ सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुक्यात मराठी जनता आहे.तेव्हा माता व बाल रुग्णालयाच्या नुतन इमारतीवर कन्नड भाषेबरोबर मराठीतुन फलक लावण्यात यावा.अन्यथा उदघाटनवेळी काळे झेंडे दाखवु असे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सांगताच
याची दखल संबधीत खात्याच्या अधिकार्यानी घेत. नुतन इमारतीवर मराठी फलक लावण्यात आला. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक सह म ए समितीतुन समाधान पसरले आहे.
खानापूर नुतन बसस्थानकावर ही मराठी फलकाची मागणी.
नुतन रूग्णालयावर मराठी फलकाची मागणी पूर्ण करण्यात आली.
आता नुतन बसस्थानकाचा ही उदघाटन सोहळा होणार आहे.तेव्हा नुतन बसस्थानकावर ही मराठी भाषेतुन फलक व्हावा.असी मागणी खानापूर म ए समितीकडुन होत आहे.