
गणेशा नगरसेवकाना बुध्दी दे रे बाबा!
खानापूर प्रतिनिधी
गेल्या वर्षभरा पासुन विद्यानगरातील समस्या बाबत सातत्याने वाचा फोडत असुन आता हिंदु धर्मातील सर्वात महत्वाचा सन म्हणजे गणेशोत्सव होय .
शनिवार पासुन गणेशोत्सवाच्या सनाला सुरूवात होत आहे . सर्वत गणेशोत्सवानिमित्त .पै पावने ,चाकरमनी घरी येत आहे.
मात्र विद्यानगरात अद्याप ही चिखलाची समस्या सुटली नाही.सध्या विद्यानगरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
विद्यानगराचे नगरसेवक याकडे फिरकलेच नाही!
खानापूर शहराच्या उपनरातील विद्यानगरात रस्ते ,गटारी नसल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले नाही.याकडे याभागाच्या नगरसेवकानी फिरकुन पाहिले नाही.
निधान गणपतीच्या सनात तरी चिखलापासुन नागरीकाना त्रास होऊन यासाठी तरी करावे हे सुध्दा मनात विचार आला नाही.
याभागातील रहिवाशी दर वर्षा घरपट्टी ,पाणी पट्टी ,दिवा पट्टी, कचरा पट्टी जवळ पास ५ हजार रूपयापर्यत टँक्स नियमित भरतात .मात्र कधी नगरसेवक समस्याचे कधीच निवारण करत नाही.
तेव्हा गणेश आता तरी तुझ्या अगमनात नगरसेवकाना चांगली बुध्दी दे .व नागरीकाना चिखलातुन मुक्त करण्यासाठी रस्त्यावर सोय करण्यासाठी पर्यायी मार्ग सुचव .
अशी मागणी विद्यानगरातील नागरीकांतुन होत आहे.