
#अध्यक्ष अँड ईश्वर घाडीचे आवाहन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
बेळगावच्या सीपीएड ग्रांऊडवर दि.२७ रोजी होणार्या अखिल भारतीय काॅग्रेस पक्षाच्या शतकपूर्ती अधिवेशनाला खानापूर तालुक्यातील काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी ४ हजारच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी शुक्रवारी दि.२०रोजी शिवस्मारक सभागृहात तालुका काॅग्रेस पक्षाच्या बोलविलेल्या बैठकीत बोलताना केले.
यावेळी ते म्हणाले की, गेल्या शंभर वर्षापूर्वी म्हणजे १९२४ साली बेळगावात काॅग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते.याला आज शंभर वर्षे होत आहेत.यानिमित्त येत्या दि. २७ रोजी भव्य अधिवेशन होत आहे.या अधिवेशनाला काॅग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी ,प्रियांका गांधी ,अखिल भारतीय काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूरचे प्रभारी व काॅग्रेस नेते पारिश जैन होते. तर व्यासपीठावर तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
प्रांरभी शहर अध्यक्ष महांतेश राऊत यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी गौसलाल पटेल ,चंबाना होसमनी,जाॅकी फर्नाडीस, केपीसीसी सदस्य महादेव कोळी, प्रकाश मादार, रामचंद्र पाटील ,सावित्री मादार आदीनी विचार मांडले.
अध्यक्षिय भाषणात पारीश जैन यानी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.व खानापूर तालुक्यातुन जास्तीत जास्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
बैठकीला गुडू टेकडी,नगरसेवक तोहिद चांदखन्नावर,इसाक पठाण विनायक मुतगेकर अभिषेख होसमनी.रामचंद्र पाटील , लियाकत बिच्चनावर,राजेद्र कब्बूर,अनिता दंडगल, दिपा पाटील, वैष्णवी पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.