
#अध्यक्षस्थानी संस्थापक पिटर डिसोझा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान १० वी व्याख्यान मालेचा सांगता समारोप रविवार दि.९ रोजी सकाळी दहा वाजता लोकमान्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक पिटर डिसोजा उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून जाॅईट रजिस्टर कल्लापा ओबनगोळ ,द.म.शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील,खानापूर एसीएफ सुनिता निंबर्गी,एम.डी.सदानंद पाटील,उद्योजक मारूती वाणी,प्राचार्या शरयू कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी १० वी विद्यार्थ्याच्या मार्गदर्शणासाठी प्रश्नप्रत्रिकाचे प्रकाशन जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ व इतर मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन विविध पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
यामध्ये विलास बेळगावकर याना ज्ञानवर्धिनी समाजरत्न पुरस्कार, प्रा.गणपती कांबळे याना ज्ञानवर्धिनी ज्ञानरत्न पुरस्कार पुरस्कार तर जांबोटी अपंग कल्याण संस्थेचे संस्थापक एस जी शिंदे याना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षक,समाज सेवक ,हितचिंतक आदीना गौरविण्यात येणार आहे.
तरी कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक,पालक व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव व्ही .बी.होसुर यानी केले आहे.