
#सावरगाळीच्या शेतकर्याला लाखोचा फटका!
#हत्तीचा बंदोबस्त करण्यात वनखाते अपयशी!
#लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अतिदुर्गम व जंगलाने व्यापलेला तालुका म्हणून ओळखला जातो.अशा तालुक्यात जंगली प्राण्याकडुन कधी पिकाचे नुकसान तर कधी माणसावर हल्ले करून अनेकानी जीव गमावले आहेत.तर शेतकर्याच्या पिकांचे लाखो रूपयाचे नुकसान केले आहे.
गेल्या वर्षबरापासुन हत्तीने तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे.
नुकताच सावरगाळी (ता .खानापूर) येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील याच्या शिवारात ऊसाचे नुकसान तर केलेच त्याच बरोबर जलकुंभ, पाण्याचे पंप,शिवाय शेतीच्या आवजाराची मोडतोड करून लाखो रूपयाचे नुकसान केले आहे.
हा हत्ती महिण्याबरापासुन गुंजी वनविभागात ठाण मांडुन बसला आहे.मात्र वनखाते हत्तीचा बंदोबस्त करण्यात साफ अपयशी ठरले आहे. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यातुन संताप व्यक्त होत आहे.यासाठी हत्तीच्या बंदोबस्तासाठी तालुक्याच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय तालुक्यातील शेतकर्यानी घेतला आहे.