
#यंदा १५ वा वर्धापन दिन होणार साजरा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
इदलहोंड ( ता.खानापूर ) गावचे ग्राम दैवत चव्हाटा देवस्थानचा १५ वा वर्धापन दिन बुधवार दि. १ जानेवारी रोजी साजरा होत आहे.
त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी ७ वाजता अभिषेक,महाआरती, आणि संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी १२ ते ३ पर्यत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ४ ते ७ पर्यत महिलासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेे.
तर रात्री ८ वाजेपर्यत दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे.तर ९ वाजता शिवचरित्र्यावर अधारीत इंचलकरंजी (महाराष्ट्र) येथील
शाहीर प्रदीप सुतार यांचा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.
# होम मिनिस्टर स्पर्धेसाठी बक्षिसे !
पहिले बक्षिस पैठणी,दुसरे बक्षिस सोन्याची नथ,तिसरे बक्षिस पैजण चौथे बक्षिस टेबल फँन अशी एकूण आठ बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच भाग घेणार्या ५१ महिलाना खास भेट वस्तू देण्यात येणार आहेत.