
# आम.विठ्ठलराव हलगेकर यांची पत्रकार परिषद!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता.खानापूर) येथील महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला साखर कारखाण्याकडुन यंदा शेतकर्याच्या ऊसाला ३००० रूपये पहिला हप्ता शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला.अशी माहिती आमदार व लैला साखर कारखाण्याचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यानी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, गेल्या वर्षी ऊस पाठविलेल्या शेतकर्याचा ५० रूपयाचा हप्ता कारखाण्याकडुन बाकी होता. तो हप्ता शेतकर्याच्या खात्यावर जमा केल्याची माहिती दिली.
लैला साखर कारखाना वजन काट्यावर शेतकर्याच्या ऊसाचे वजन काटकोरपणाने करत आहे. शिवाय प्रत्येक वर्षी काही शेतकर्याचा अचानकपणे किंव्हा शाॅर्ट सर्किट मुळे अन्यथा इतर कारणानी आग जळालेला ऊस संकट समयी लैला साखर कारखाना लगेच मदतीला जातो.
तेव्हा लैला साखर कारखाना हा तालुक्यातील शेतकर्याचा कारखाना आहे.तेव्हा सर्व ऊस उत्पादक शेतकर्यानी लैला साखर कारखान्याला ऊस पाठवुन देण्याचे आवाहन केले आहे.
यंदा लैला साखर कारखान्यात २० कोटी रूपये खर्चून नविन दोन बाॅयलर बसविण्यात आले आहे. त्यामुळे लैला साखर कारखाना एक महिना उशीर चालविण्यात आला आहे.असे सांगीतले.