
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
रविवारी खानापूर शहरालगतच रूमेवाडी क्राॅसजवळ ऊसाला आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान झाले. ही घटना ताजी असताना मंगळवारी दि.३१ डिसेंबर रोजी दुपारी खानापूर शहरातील मारूती नगराजवळील शेतवाडीत असलेल्या गवत गंजीना आग लागुन ८ ट्राॅली गवत जाळुन हजारो रूपयाचे नुकसान झाले.
लागलीच घटनास्थळाजवळील नागरीकानी अग्निशामक दलाल पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानानी आग विजविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा जवळ अनेक घरे होती. त्या घराना ही आगीची झळ पोहचली असती मात्र आग विजविल्याने अनर्थ टळला.त्यामुळे नागरीकानी सुटकेचा निस्वास सोडला.
दुर्घटनेत नागेश शंकर गुरव तसेच अशोक अशोक गणेश गुरव या शेतकर्याचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुका सेक्रेटरी गु़ंडू तोपिनकट्टी, अनेक शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. नुकसान ग्रस्थ शेतकर्याना नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी नागरीकातुन होताना दिसत होती.