
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर येथील इन्नरव्हील क्लब च्या वतीने चिरमुरकर गल्ली हायर प्राथमिक मराठी मुला मुलींच्या च्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम पार पडला ..कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. टी. सायनेकर होत्या. प्रमुख अतिथी इन्नर व्हील क्लब च्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम, क्लब च्या सदस्यां समृद्धी सुळकर सहशिक्षिका जे बी होसूर व्यासपीठावर उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीत व ईशस्तवनाने झाली.. इन्नर व्हील क्लब च्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि क्लब च्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची माहिती सांगितली.
.एच एल करंबळकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रमुख वक्त्या दीप्ती बडदाली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या शोषण संबंधित घडणाऱ्या वाढत्या घटनासंदर्भात चांगला वाईट स्पर्श ओळखण्याचे ज्ञान प्रात्यक्षिक सह करून दाखवले.. जेणेकरून मुलांच्या बाबतीत घडणाऱ्या संभाव्य धोक्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे..क्लब च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले..सदर समारंभाला इन्नर व्हील क्लब चे सर्व सदस्य शाळेचे शिक्षक टी बी मोरे, व्ही एफ सावंत, जे पी पाटील, स्नेहल चौगुले व विद्यार्थी उपस्थित होते..