
#तहसीलदाराना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराह तालुक्यातील खेड्यात स्थापन केलेल्या क्रांती सेना को.आँप.सोसायटी व समृधदी को.आँप .सोसायटीच्या कारभाराची चौकशी करावी. व या दोन्ही सोसायटीकडुन गरीब ठेवीदारांच्या थकीत असलेल्या ठेवी त्याना परत मिळवुन द्याव्यात.अशा मागणीचे निवेदन खानापूर श्रीराम सेना हिंदुस्थान व आंबेडकर युवा मंच यानी तहसीलदारांकडे केली आहे.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान माडीगुंजी शाखा प्रमुख पंकज सावंत,व आंबेडकर युवा मंचचे अध्यक्ष राम मादार यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दि ६ रोजी उपतहसीलदार के आर कोलकार याना मागणीचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही सोसायटीकडुन ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास टाळा टाळ होत आहे. याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी उपतहसीलदार के आर कोलकार यानी निवेदनाचा स्विकार करून योग्य निर्णय दिला जाईल असे आश्वासन दिले.
निवेदन देताना पंकज सावंत,राम मादार,निलेश जांबोटकर,जोतिबा पाटील,वसंत बांदोडकर,सदानंद कुंभार आदी उपस्थित होते.