
#बाळासाहेब शेलार यानी दिली माहिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सर्वात जुनी बॅक (अर्बन बॅक) सध्याची खानापूर को.आँप.बॅक म्हणून ओळखल्या जाणार्या बॅकेची पंचवार्षिक निवडणुक दि.१२ रोजी होत आहे.
खानापूर शहरासह तालक्यात १९२१साली स्थापून नावारूपास आलेल्या खानापूर को.आँप.बॅकेमध्ये झालेला गैरव्यवहार,नोकरभरतीत झालेला भ्रष्टाचार यावर आळा घालण्यासाठी व दुसरीकडे माझे वडील कै.महादेव शेलार यांनी अनेक वर्षे संचालक,चेअरमन,व्हा.चेअरमन म्हणून खानापूर को.आँप.बॅक नावारूपाला आणली.त्यानी बॅकेच्या भल्यासाठी कार्य केेले.त्यानी कधीही चरित्र्याला डाग लागु दिला नाही. परंतु माझ्या वडीलाच्या कार्यकृत्वाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे.याचा परिणाम शेलार कुटूंबीयावर होऊन मानसिक त्रास होत आहे.
यासाठीच विद्यामान संचालकाना धडा शिकविण्यासाठी आम्ही बॅक विकास पॅनल उभे केले आहे.
यात जेष्ठ संचालक शिवाजी पाटील, मारूती खानापूरी, कै.बाबूराव चित्रगार यांचे सुपूत्र राजेद्र चित्रगार आदीनी पुढे होऊन विकास पॅनेल स्थापन करून विद्यामान संचालकाच्या सहकार पॅनेल विरोधात ही निवडणूक लढविणार असल्याचे उमेदवार बाळसाहेब शेलार यानी पत्रकाराशी बोलताना सांगीतले.
यावेळी बोलताना जेष्ठ संचालक शिवाजी पाटील म्हणाले की विद्यमान संचालकाने सर्व नियम धाब्यावर ठेवूण मनमानी करून नोकरभरतीत मोठा भ्रष्ठाचार केला आहे.यासाठी विकास पॅनल उभारले आहे.असे सागीतले.
#विकास पॅनेल मधील उमेदवार!
गोविंद डिगेक,गंगाराम गुरव,बाळासाहेब महादेव शेलार,राजेंद्र बाबूराव चित्रगार,शांताराम निकलकर, सिताराम बेडरे,संतोष हंजी,रंजना पाटील,शोभा खानापूरी,कृष्णा मल्लापा कुंभार,शिवाजी चुडाप्पा पाटील,मारूती खानापूरी,राजकुमार शिवाप्पा पाटील आदी १३ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत.यामध्ये ७ उमेदवार सामान्य गटातुन, महिलागटातुन २, अ वर्गातुन १,ब वर्गातुन १,एस सी गटातुन १ ,एस टी गटातुन १अ असे उमेदवार असे उमेदवार उभे आहेत.
तेव्हा सभासदानी विकास पॅनलच्या १३ ही उमेदवाराना भरघोस मतानी निवडुण द्या
असे विकास पॅनलच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.