
चेअरमन पदाची हॅट्रीक #साधली!
#व्हा. चेअरमन पदी लक्ष्मण कसर्लेकर !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहरातील पी एल डी (भूविकास) बॅकेची निवडणुक नुकताच पार पडली .या निवडणुकीत १५ पैकी १३ संचालकांची बीनविरोध निवड पार पडली.तर दोन जागाकरीता निवडणुक घेण्यात आली.
त्यानंतर चेअरमन ,व्हाईस चेअरमन निवडणुकीत सर्वच संचालकानी चेअरमन पदासाठी मुरलीधर पाटील यांच्या नावाची घोषणा केल्याने चेअरमन पदासाठी बीनविरोध निवड झाली.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर गणपतराव पाटील हे पी एल डी बॅकेवर चारवेळा संचालक पदी निवडुण आले आहेत. तर दोन वेळा चेअरमन पद साभाळले.त्यांची पुन्हा चेअरमन पदी निवड झाल्याने चेअरमन पदाची हॅट्रीक साधली आहे.
तर व्हाईस चेअरमन पदी आमटे ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांची निवड करण्यात आली.
निवड होताच.संचालक व हितचिंतकानी त्याचे अभिनंदन केले.
यावेळी संचालक नारायण नागाप्पा पाटील (बिजगर्णि ),सुभाष निंगाप्पा गुरव(हलशी),सुनिल विठ्ठल चोपडे (माळ अकले),अशोक बाबू पाटील ( चिक्कदिन- -कोप) सुदीप बसनगौडा (इटगी), श्रीकांत सहदेव करजगी,शंकर विष्णू सडेकर,यमनाप्पा चंदप्पा राठेड, निळकंठ गुंजीकर,विरूपाक्षी पाटील (बरगांव),संचालिका लक्ष्मी पाटील (तिओली,)सुलभा धनाजी आबेंवाडकर,कुतुबुद्दीन बिचन्नावर,आदी संचालक उपस्थित होते.