
#विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांचा विश्वास!
#पत्रकार परिषदेत दिली माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सर्वात जुनी अर्बन बॅक म्हणून ओळखल्या जाणार्या सध्याची खानापूर को.आँप.बॅकेची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया येत्या रविवारी दि.१२ रोजी येथील समर्थ इंग्रजी शाळेत होणार आहे.
तेव्हा जुन्या व विद्यमान संचालकानी सहकार पॅनल मधुन निवडणुक लढवित आहेत.
यानिमित्त् गुरूवारी दि.९ रोजी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विद्यमान चेअरमन अमृत शेलार म्हणाले की,सन १९२१ साली स्थापन झालेल्या बॅकेचा विकास व्हावा. याहेतुन जुन्या व विद्यमान संचालक मंडळाकडे धुरा सातत्याने सोपविला आहे.यंदा देखील बीनविरोध निवडणुक व्हावी.यासाठी सर्वानी शर्थीचे प्रयत्न केले.परंतु काहीच्या हेकेखोरपणामुळे निवडणुकीच्या सामोरे जावे लागले.
त्यातच विरोधी पँनलने खोटा प्रचार करून सभासदांची दिशाभुल करत आहे.
बॅकेच्या नोकर भरतीत गैरव्यवहाराचा आरोप!
बॅकेच्या नोकर भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधक करत असुन नोकर भरती सहकार खात्याच्या नियमानुसार,मिरीट नुसार असुन जाॅईट रजिस्ट्रार यांच्या देखरेखीखाली पारदर्शक झाली आहे. बॅकेच्या विस्ताराच्यादृष्टीने व ३ नव्या शाखामध्ये कर्मचार्याची गरज भासल्याने नोकर भरती करण्यात आली. यानिवड भरतीत तालुक्यातील कर्मचारी आहेत. ही भरती मेरीटनुसार झाल्याने विरोधी पॅनलना कोणताही मुद्दा नसल्याने नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत.
शतकमहोत्सव निमित्त ३ शाखा सुरू!
बॅक शंभर वर्षाचा ऐतिहासीक टप्पा पूर्ण करत असताना तीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.आदी शाखा उभारून शतकमहोत्सवाची भेट सभासदाना द्यावी.व मगच शतक महोत्सव साजरा करावा.हा हेतू होता.परंतु तीन शाखेमुळे बॅकेला तोटा झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
मात्र गेल्या तीन महिण्यात बिडी,पारिश्वाड,व काकतीवेस बेळगांव या शाखानी साडे तीन कोटीचे रूपयचे कर्ज वितरण केले तर दीड कोटी रूपयाचे सोने तारण कर्ज वाटप केले आहे.उत्तम व्यवहार सुरू आहे.रिझर्व बॅकेची रितसर मंजुरी घेऊनच शाखा सुरू केल्या आहेत.तेव्हा नव्या शांखाना परवानगी हीच बॅकेची प्रगती आहे.
लाॅकरची सुविधा!
तालुक्याच्या ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले .घरफोडी करून लोकांचे दागदागिने व पैसे चोरीला जात असल्याने सभासदाची गरज ओळखुन लाॅकरची सोय केली.
कर्ज वितरणावेळी रिझर्व बॅकेचे नियमाचे पालन!
रिझर्व बॅकेच्या नियमाचे पालन करून कर्ज वितरण करावे लागते.तेव्हा २५ ते ५०हजार रू.कर्ज प्रकरणालाही ग्राहकाकडुन आवश्यक कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतरच बँकेला कर्ज मंजुऱ करता येते.त्यामुळे लहान कर्जदाराना कर्ज देताना बॅक ग्राहकाची आडवणुक करते.व कर्ज वसुलीसाठी बॅक ग्राहकाना त्रास देते हा खोटा आरोप आहे.
ही वस्तूस्थिती असताना विरोधकाना प्रचारासाठी कोणताच मुद्दा नसल्याने बॅकेशी प्रामाणिक असलेल्या विद्यामान संचालकावर खोटे आरोप चालविले आहेत.
यावर खानापूर को.आँप.बॅकेच्या सभासदानी काडीचाही विश्वास ठेवू नये.
व सहकार पॅनल भरघोस मतानी निवडुण आणा. असे आवाहन केले.
माजी आमदार अरविंद पाटील यांचे आवाहन!
आज पर्यत खानापूर को.आँप बॅकेच्या जुन्या व विद्यमान संचालकानी बॅकेची प्रगती केली आहे. यंदा बॅकेचे शतकमहोत्सव वर्ष असुन जुन्या व विद्यमान संचालकाना शतकमोहत्सव साजरा करण्यासाठी व त्याच्या प्रयत्नाना यश येण्यासाठी सर्व सभासदानी सहकार पॅनलला भरघोस मत देऊन विजय करा.असे आवाहन केेले आहे.
# सहकार पॅनलचे उमेदवार!
यावेळी सामान्य गटातील उमेदवार विद्यमान चेअरमन अमृत महादेव शेलार,परशराम रा.गुरव,विठ्ठल निं.गुरव,मेघशाम घाडी,डाॅ.सी जी पाटील,रविंद्र देसाई,रमेश श.नार्वेकर,
महिला गट!
अंजली कोडोळी,अंजुबाई गुरव.
मागास अ गट!
विजय देवाप्पा गुरव,
मागास ब गट!
मारूती बाबूराव पाटील.
अनुसूचित जाती गट!
मारूती बिलावर
अनुसुचित जमाती गट!
अनिल शिवाजी बुरूड
या सर्व उमेदवाराना सहकार पॅनल मधुन भरघोस मतानी निवडूण द्या.असे आवाहन करण्यात आले आहे.