
#शिमोग्यातील प्रशिक्षित हत्तीचा वापर!
#टस्कर पाहण्यासाठी लोकांची गर्दी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर तालुका जंगलाने व्यापलेला तालुका असल्याने जंगली प्राण्याचा त्रास खानापूर तालुक्यातील शेतकर्याना नेहमीच सहन करावा लागतो.
जळगे ( ता.खानापूर ) येथे गेल्या दोन महिण्यापासुन ठाण मांडुन हैदोस घातलेल्या टस्करचा बंदोबस्त करा.अशी मागणी सातत्याने होती.
याची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर यानी वनखात्याकडे सातत्याने आवाज उठवला.
त्यामुळेच गुरूवारी दि.९ सकाळी टस्करला जेरबंद करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली.शिमोगा जिल्ह्यातील सक्रेबैल हत्ती कॅप मधुन चार प्रशिक्षित चार हत्तीचा वापर करत ३० कर्मचारी वर्गाचा सहभाग होता.
यावेळी जळगे गावच्या शिवारातील ऊसाच्या मळ्यात टस्कराचा माग लागताच डाॅ . सुरेश यानी हत्तीला बेशुध्द केले.
त्यानंतर टस्करला चार प्रशिक्षित हत्तीच्या सहाय्याने माहुतानी ऊसाच्या मळ्यातुन जेरबंद करून टस्करच्या पायाला दोरखंड बांधुण बराच वेळेच्या अथक प्रयत्नाने ट्रस्करला ट्रकमध्ये घालुन शिमोग्याला घेऊन जाण्यात यश आले.
यावेळी टस्करची मोहिम पाहण्यासाठी खानापूर शहरासह जळगे, करंबळ ,चापगांव आदी गावच्या नागरीकानी व महिलानी ही गर्दी केली होती.यावेळी जमावला आवरण्यासाठी घटनास्थळी पोलिसाचा बंदोबस्त होता.
यावेळी बोलताना मुख्य वनसंरक्षणाधिकारी मंजुनाथ चव्हाण म्हणाले की,खानापूर तालुक्यात तीन गटात दहा हत्ती वावरत आहेत.
त्यातील दोन कळप गुंजी,नंदगड वनपरिक्षेत्रात तर हा एकच टस्कर जळगे शिवारात वावरत होता.त्यामुळे जीवीतास हानी पोहचण्याची भिती होती .त्यासाठी हलविण्यात आले.