
#नारळ,केळी,भाजीपाल्याचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात हत्तीकडुन पिकांचे नुकसान हे वर्षेभर सुरूच आहे.
नुकताच जळगे ( ता.खानापूर ) येथील शिवारात ठाण मांडुन बसलेल्या हत्तीचा सक्रेबैल ( जिल्हा शिमोगा ) येथील हत्ती कॅप मधुन चार प्रशिक्षित हत्तीकडुन बंदोबस्त करण्यात आला.
ही घटना ताजी असताना कौंदल ( ता.खानापूर ) परिसरात पुन्हा हत्तीचे आगमन झाले आहे. कौंदलचे शेतकरी व शेतकरी नागशे भोसले यांच्या सर्वे १०० मधील शेतातील नारळ,केळी सागवानची झाडे,भाजीपाल व इतर साहित्याचे आतोनात नुकसान केले. त्यामुळे हजारोचे नुकसान झाले.
याबाबत नागेश भोसले यांच्या कडुन मिळालेली माहिती अशी की, आज मगंळवारी सकाळी नागेश भोसले नेहमी प्रमाणे आपल्या सर्वे नंबर १०० मधील शेतातील केळीची झाडे, नारळाची झाडे मुळासकट उपटून टाकण्यात आली.
तर शेतातील भाजीपाल्याची नासधुस केल्याने त्याचे हजार रूपायांचे नुकसान झाले.
हत्तीच्या पाऊल खुणा वरून तीन हत्ती असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हत्तीनी केलेल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी करून वनखात्याने नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी शेतकर्यातुन होत आहे.