
गर्लगुंजीच्या माजी सैनिक संघटनेच्यावतीने सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याचे भाग्य प्रत्येकाला मिळत नाही.कारण सर्व श्रेष्ठ सेवा जी कोणती असेल तर ती सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यात आहे.
इतर सेवा आहेत.शिक्षकी सेवा, बॅक सेवा,अशा विविध खात्यामधुन सेवा केली जाते. मात्र आपल्या देशाची सेवा भारतीय सैनिक म्हणून करताना सैनिकांचा उर भरून येतो. रात्रनंदिवस डोळ्यात तेल घालुन सीमेवर रक्षण करताना आपल्या मातृभूमीचे रक्षण करतो. याचा आनंद इतर सेवेत नाही.
तेव्हा जे युवक सैन्यात भरती झालेत. त्यानी प्रामाणिक पणे देशाची सेवा बजवावी आपले नांव ,गावचे नांव उज्वल करावे.
असे आवाहन गर्लगुंजी ( ता. खानापूर ) येथील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव मेलगे यानी बुधवारी दि.१५ रोजी गर्लगुंजी माजी सैनिक संघटनेच्यावतीने नव्याने भारतीय सैन्यात आय.टी.बी.पी. व सी.आर.पी. एफ मधेय भरती झालेल्या युवकांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
पुढे म्हणाले की गुर्लगुंजीच्या मुली ही आता मागे नाहीत. त्याही भारतीय सैन्यात आय.टी.बी.पी मध्ये भरती झाल्या आहेत. त्याचा आदर्श युवतीनी घ्यावा.असे आवाहन केले.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे मार्गदर्शक व निवृत भारतीय आर्मी अधिकारी अजित पाटील यांच्या हस्ते सी.आर. पी.एफ.मध्ये भरती झालेले युवक दर्शन चौगुले व साहिल कोलेकर यांचा शाल,पुष्पगुच्छ व मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अजित पाटील यांच्या पत्नी सौ.पाटील याच्याहस्ते सी.आर.पी.एफ.मध्ये भरती झालेल्या मनाली सतीश सिध्दाणी व निलम अनंत मेलगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार सोहळ्याला माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाबुराव मेलगे,मार्गदर्शक अजित पाटील ,प्रभाकर पाखरे,शाहु पाटील,सुनिल मेलगे, राजू हंप्पण्णावर,श्रीधर पाटील,
परशराम पाटील, मनोहर चौगुले,बळीराम पाटील,कल्लापा मेलगे,नारायण पाटील ,शिवाजी पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.