
#विठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धा!”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
माणसाने भक्तीचा मार्ग स्विकारला तर जीवनात आनंद मिळतो .मनाला शांती मिळते. म्हणून प्रत्येकाने संगीत भजनात तल्लीन होणे गरजेचे आहे.
आजच्या पिढीमधुन अनेक आजार उदभवत आहेत. तुम्ही केवळ मोठ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणावा तुमचे रक्ताभिसरण चांगले राहते. अलिकडे ब्लाॅकेज होऊन अनेकाना मरणाची भिती वाटते.जरतुम्ही नियमित विठ्ठल,विठ्ठल मोठ्याने नाम जप केला तर चांगले रक्ताभिसरण होऊन ब्लाॅकेजचा त्रास होणार नाही. दुसरीकडे त्याच विठ्ठलच्या अंभगाने मला शांती मिळेत. यासाठी विठ्ठल नाद हे संगीत भजनाचे कार्यक्रम होणे आजची गरज आहे.
असे विचार आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी खानापूरात श्री.चौराशीदेवी संगीत कलामंच याच्यावतीने आयोजित ” विठ्ठल नाद” संगीत भजनस्पर्धाच्या उदघटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी तालुका पंचायत माजी सदस्य बाळाराम शेलार होते.
प्रास्ताविक संगीत विशारद मष्णू चोर्लेकर यानी केले.
तर कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित मान्यवर पंढरी परब, समितीचे नेते प्रकाश चव्हाण,साईप्रतिष्ठानचे संस्थापक के.पी. पाटील, राष्ट्रीय पुरस्कार आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी,प्राचार्या सौ.शरयू कदम, कृष्णा देवलतकर,प्रा.शंकर गावडा आदीच्या हस्ते दीपप्रज्वलन व विविध फोटोचे व संगीत वाद्य पुजन करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर समितीचे नेते मर्याप्पा पाटील, ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर,कृष्णा गुरव,भरमाणी पाटील,वसंत गुंडपीकर गुरूजी, एन एम पाटील,संभाजी पाटील, ईश्वर बोबाटे,प्रल्हाद गुंडपीकर,फोडु सुतार,धर्माजी नंद्रणकर महादेव काद्रोळकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
या यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्यासह विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब शेलार म्हणाले की, आपली भारतीय हिंदू संस्कृती टीकायची असेल तर कुटूंबात चांगले संस्कार शिकले पाहिजे तरच समाजात सन्मान मिळतो. घराघरात विठ्ठल भक्तीचा नाद उमटला पाहिजे.यासाठी श्री चौराशी देवी संगीत कलामंच कडुन गेली चार वर्षे श्री विठ्ठल नाद संगीत भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. याची रसीकानी लाभ घ्यावा.असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शंकर गावडा यानी केले.