
#कमिते कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक तर करा कराटे स्पर्धेत कास्यपदाची मानकरी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी अदिती ज्ञानेश्वर नाडगौडा हिने बेंगलुर येथे दि.२ जानेवारी रोजी देशपातळीवरील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत भाग घेऊन कमीते कराटे स्पर्धेत प्रथम क्रमाकांसह सुवर्ण पदक मिळविले.
तर करा कराटे स्पर्धेत कास्य पदक पटकावुन समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे नाव अजरामर केले आहे.
तिला कोच सेनसाय हरिश सोनार याचे मार्गदर्शन लाभत आहे.
तिच्या यशाबद्दल खानापूर तालुक्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कराटे पटू अदिती ज्ञानेश्वर नाडगौडा ही समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन व खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅ. ज्ञानेश्वर नाडगौडा व स्कूलच्या प्रायार्या सौ दिव्या नाडगौडा या दापंत्याची कन्या होय.
तिच्या यशा मागे प्राचार्या,शिक्षक वर्ग यांचे प्रयत्न आहेत.