#घाडी दापंत्याच्या सौजन्याने रिंगण सोहळा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
संगरगाळी (ता.खानापूर) येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्या गुरुवार दि. १६ पासून दोन दिवस होणार आहे. यानिमित्त गुरुवार दि.१६ रोजी सकाळी ८ वाजता पोथी स्थापना, त्यानंतर ज्ञानेश्वरी अध्यायाचे वाचन, ४ वाजता तुकोबांच्या गाथ्यावरचे भजन, प्रवचन, रात्री ९ वाजता किर्तन, हरी जागर, शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी काला कीर्तन, दिंडी सोहळा, सकाळी १०.३० वाजता खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ईश्वर घाडी व त्यांच्या पत्नी सौ.पार्वती घाडी यांच्या सौजन्याने रिंगण सोहळा होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता महाप्रसाद होऊन पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.