
#खानापूर भाजप पदाधिकारीची निवड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
दक्षिण पश्चिम रेल्वे हुबळी विभागाकडुन खानापूर व देवराई रेल्वे स्थानकावर रेल्वे सुधारणा कमिटीची स्थापना करण्यात आली आहे .
दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापकांनी आदेशाची प्रत निवड झालेल्या संबक्षिताना दिली आहे. अशी माहिती खानापूर तालुक्याचे लोकप्रिय विठ्ठलराव हलगेकर यांनी दिली आहे.
या खानापूर रेल्वेस्थानक सुधारणा कमिटीवर खानापूर तालुका भाजप पक्षाचे नेेत सुनिल नायक राजेंद्र रायका,गुंडू तोपिनकट्टी, सुनिल मासेकर व प्रकाश निलजकर तर देवराई रेल्वे स्थानक सुधारणा कमिटीवर राजश्री देसाईं, दिलीप सोनटक्के ,राजू रपाटी,नागराज गौडापगोळ ,रमेश सत्यन्नावर यांचा समावेश असुन सदर निवड येत्या डिसेंबर २०२६ पर्यत अशा दोन वर्षाच्या कालावधीपर्यत राहणार आहे.