
#नगरसेविकांतुन जेष्ठ नगरसेविका मेघा कुंदरगी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
अखेर खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्य,उपनराध्यक्ष पदाची निवडणुक २७ जानेवारी रोजी जाहीर झाली. तशी नगरसेविकातुन निवडणुकीचे वार वाहु लागले.
दोन्ही ही प़दे सामान्य महिला करीता!
खानापूर नगरपंचायतीच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष निवडणूक सोमवारी दि.२७ जानेवारी रोजी होणार आहे. दुपारी ३ वाजता निवडणूकीचा प्रक्रिया नगरपंचायतीच्या सभागृहात होणार आहे.
सोमवारी दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता पर्यत नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत .
अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अर्जाची छाननी होऊन दुपारी ३ वाजता निवडणुक प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.निवडणुक अधिकारी म्हणुन तहसीलदार प्रकाश गायकवाड काम पाहणार आहेत.
या निवडणूकीच्या संदर्भात नगरपंचायतीच्या २० नगरसेवकाना नोटीस जारी करण्यात आली आहे.
ही निवडणूक केवळ दोन वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे सामान्य महिला पदासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
खानापूर नगरपचायतीवर २० नगरसेवका पैकी ९ महिला नगरेसविका आहेत.
#नगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका मेघा कुंदरगी इच्छूक !
खानापूर शहरातील प्रभाग नंबर १५ च्या नगरसेविका सौ. मेघा कुंदरगी या गेल्या चार वेळा नगरसेविका म्हणून निवडूण आल्या आहेत.
त्या सन २००१ पासुन ते आज २०२५ पर्यत नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. तर २००७ साली उपनगराध्यक्षा म्हणून काम केले आहेत.
सध्या प्रभाग नंबर १५ समादेवी गल्ली मधुन निवडुण आलेत.तसेच प्रभाग नंबर १४ दुर्गानगरमधुन त्या निवडूण आल्या होत्या.
आजच्या सर्व नगरसेविकातुन जास्त वेळा निवडूण आलेल्या नगरसेविका म्हणून सौ.मेघा कुंदरगीच्याकडे पाहिले जाते.
त्यानी आता पर्यत आपल्या भागात पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असुन पाच कुपनलिका खोदल्या आहेत.
आपल्या भागात पथदिपची सोय केली आहे. गरीब विद्यार्थ्यासाठी सरकारी योजनेतुन कॅप्यूटर मिळवून दिली आहेत.
अपंगासाठी टुव्हीलरची मदत करून दिली आहे.
गरीबाना घरे बांधण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या फंडातुन १ लाख ६० हजार रूपये आर्थिक मदत केली आहे.
तेव्हा खानापूर शहराच्या विकासासाठी मी नगराध्यक्षा होऊन मला खानापूर शहराचा कायापालट करण्याची माजी ईच्छा आहे.
तेव्हा मला नगराध्यक्षाचा मान मिळविण्यासाठी सर्व नगरसेवकानी मदत करावी .असी प्रतिक्रिया त्यानी बोलवून दाखविली.