
#प्रजासत्ताक दिनी तालुका अधिकारी राहतात गैरहजर!
#तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाची पूर्वभावी बैठक संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी.
यंदा रविवार दि २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन आहे.तर शनिवारी चौथा शनिवार सार्वजनिक सुट्टी आहे. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने तालुका अधिकार्यानी रविवारी दि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला दांडी मारू नये.अशी सुचना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व भावी सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यानी बैठकीत केली.
प्रजासत्ताक दिनाची पूर्वभावी बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी पार पडली.अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर होते.व्यासपिठावर तहसीलदार प्रकाश गायकवाड,सीपीआय लालसाब गवंडी, सामाजिक कार्यकर्ते चंबान्ना होसमनी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक तहसीलदार प्रकाश गायकवाड यानी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी काडगी यानी प्रजासत्ताक दिन मलप्रभा क्रिडांगणावर होणार आहे. तेव्हा क्रिडांगणावर पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी.पोलिसाची व्यवस्था व्हावी. विद्यार्थ्याच्या कवायतीसाठी ग्रांऊंडवर कापड पट्ट्याची सोय करावी. विद्यार्थ्याना नाष्टा देण्यात यावा.व इतर सोयी कराव्यात अशी सुचना केली.
तर दशरथ बनोशी यानी सालाबाद प्रमाणे क्रिडांगणावर पोलिस पिरेड व्हावा.विद्यार्थ्याचे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हावे. असे सुचित केले. त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनेईकर यानी वाळू उपसा मुळे मलप्रभा नदीचे पाणी गढुळ झाले आहे. याकडे तहसीलदाराचे तसेच नगर पंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी समस्या निर्माण होणार याकडे लक्ष देण्याची मागणी केली.
प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी तालुका अधिकार्यानी वर्गणी वेळेत व न चुकता देऊन सहकार्य करावे. चौकाचौकात व महापुरूषाच्या पुतळ्याला विधुत रोषणाई हेस्काॅम खात्याने करावे. असे कार्यकर्त्यानी सुचित केले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यानी विविध सुचना केल्या.
आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले स्वातंत्र्य दिन ,प्रजासत्ताक दिन ,गांधी जयंती आदी राष्ट्रीय सन मोठ्या उत्साहात साजरे होतात. या दिवशी तालुका अधिकारीवर्गाने न चुकता राष्ट्रीय सन साजरे करावे. प्रजासत्ताक दिनाबद्दल एक मराठी व एक कन्नड मधुन कार्यकर्त्याचे भाषण व्हावे. यासाठी कार्यकर्त्यानी नांवे नोंदवावी. असे आवाहन करून प्रजासत्ताक दिन मलप्रभा क्रिडांगणावर मोठ्या उत्साहाने साजरा करू.असे सांगीतले.
बैठकीत सामाजिक कार्यकर्ते चंबन्ना होसमनी, मल्लेशी पोळ.संजय कुबल ,श्री टेकडी, नगरसेवक प्रकाश बैलुरकर आदीनी वेगवेगळ्या सुचना मांडल्या.
बैठकीला विविध खात्याचे तालुका अधिकारी उपस्थित होते. तसेच गुंडू तोपिनकट्टी,बाबा देसाई,सुरेश सिंगे,तानाजी गोरल,शंकर पाटील, असे शकडो सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.