
#रेल्वेस्टेशन रोडवरील सरकारी दवाखान्या सोमारील चार दुकानात चोर्या!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अलिकडे खानापूर शहरात चोर्याचे प्रमाण वाढले आहे. खानापूर शहरातील गजबजलेल्या शिवस्मारक चौकापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या रेल्वेस्टेशन रोडवरील सरकारी दवाखाण्याच्या समोर असलेल्या सुळकर मेडिकल, टेकडी बाॅड रायटर ,विकी फोटोग्राफर,व महेश सायबर यांच्या मालकीच्या दुकानात शटर तोटुन चोरीचा प्रयत्न केला. त्याआदी चोरट्यानी कॅमेरेही तोडुन टाकल्याचे दिसुन आले आहे.
त्यामुळे खानापूर पोलिसाना हिमत असेल तर पकडुन दाखवा.असे आवाहन चोरट्यानी केल्याचे जानवत आहे.
चोरट्यानी दुकानाचे शटर तोटून प्रवेश केला व टेकडी यांच्या दुकानातील ८ हजार रूपये ,महेश सायबर यांच्या दुकानातील ५ हजार रूपये, तर विकी फोटोग्राफर याचा ७० रूपये किमतीचा कॅमेरासह काही रक्कम, तर सुळकर मेडिकल मधुन किरकोळ रक्कम लांबविली आहे.
मंगळवारी सकाळी सदर चोरी झाल्याचे दिसुन आले.याठिकाणी दुकानांची शटर तोडल्याचे उघड झाले आहे.
चोरी संदर्भात खानापूर पोलिस स्थानकात तक्राराची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.