
#भाजपच्या सदस्यांचाच अविश्वासाचा ठराव!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बैलूर ( ता. खानापूर ) ग्राम पंचायतीचे अध्यक्ष रामलिंग ओमानी मोरे याच्या विरोधात भाजपच्याच सदस्यानी अविश्वासाचा ठराव समंत करून पदावरून पायउतार करण्यास बुधवारी (दि.२२ ) रोजी लावले.
ग्राम पंचायतीच्या १६ सदस्यांपैकी ११ सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात मतदान केले. तर ३ सदस्यांनी अध्यक्षाच्या बाजुने मतदान केले. एक सदस्य गैरहजर राहिल्याने व एक सदस्या माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे याच्या पत्नी़चे नुकताच निधन झाल्याने एक सदस्यांची जागा खाली आहे.११ सदस्यांच्या विरोधात अध्यक्षांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला.
खरे पाहता जांबोटी भागात बैलूर ग्राम पंचायत ही मोठी ग्राम पंचायत मानली जाते. अध्यक्षाबद्ल नाराजी असल्याने अविश्वासाचा ठराव समंत झाला.व अध्यक्ष पद गमावले.