
#खानापूर सरकारी दवाखाण्यात डायालासीस मशीनेच आम.हस्ते उदघाटन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
अलिकडच्या काळात डायालासीस रूग्ण झपट्याने वाढत आहेत. त्यामुळे खानापूर सरकारी दवाखाण्यात गेल्या सहा महिण्यापासुन डायलासीस मशीनची मागणी होत होती.त्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून दोन डायलासीस मशीनची व्यवस्था झाली आहे. त्यामशीनचे उदघाटन गुरूवारी पार पडले. आणि खानापूर तालुक्यातील डायलासीस रुग्णाना यांचा खुप मोठा लाभ होणार आहे. तेव्हा बेळगावला जाण्यार्या डायालासीस रूग्णानी खानापूर सरकारी दवाखाण्यात उपचार करून घ्यावा. असे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी सरकारी दवाखान्यात डायालासीस मशीनच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.
प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.महेश किवडसण्णावर यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी डायालासीसचे डाॅ.कोणी, डाॅ.नारायण वडिण्णावर, आँपरेटर कु.यल्लामा, कर्मचारीवर्ग व भाजपचे नेते व सचीव गुंडू तोपिनकट्टी ,माजी अध्यक्ष संजय कुबल,राजेद्र रायका, बाबा देसाई, चांगाप्पा बाचोळकर, प्रकाश निलजकर,श्रीमहलक्ष्मी सोसायटीचे व्हा.चेअरमन विठ्ठल करंबळकर, सोसायटीचे एडमिन गुंडू पाखरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी डायालासीस मशीनेची पुजा करून उदघाटन केले.
कार्यक्रमाला दवाखाण्यातील कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. आभार डाॅ.नारायण वड्डिणावर यानी मानले.