
#बैठकीत सल्लागारानी केल्याअधिकार्याना सुचना!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर रेल्वेस्टेशन सल्लागार समितीची निवड भाजपचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रयत्नाने करण्यात आली. या सल्लागार समितीत भाजपचे नेते राजेंद्र रायका, गुंडू तोपिनकट्टी,सुनिल नायक ,सुनिल मासेकर ,प्रकाश निलजकर आदीची निवड झाली आहे.
यानिमित्त पाच सदस्यांचे नाॅमिनेशन पत्र खानापूर रेल्वेस्टेशन आँफिस मध्ये देऊन त्याचे स्वागत व सत्कार बेळगांवचे चीफ कमर्शिल इंन्स्पेक्टर भीमाप्पा मेदार व खानापूर रेल्वे स्टेशन सुपरिटेंडेट राजीव कुमार यांच्याहस्ते नाॅमिनेशन पत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना खानापूर रेल्वेस्टेशन सल्लागार समितीचे सदस्य राजेद्र रायका म्हणाले की ,खानापूर रेल्वेस्टेशनच्या आजूबाजुच्या जवळपास शेकडो खेड्यातील प्रवाशी खानापूर रेल्वेस्टेशनवरून मु़बई ,पुणे, गोवा ,दिल्ली ,बेंगळुर म्हैसुर,अजमेर ,जोधपूर ,जम्मू आदी ठिकाणी प्रवास करतात.त्याचबरोबर भारतीय सैन्यात भरती झालेले अनेक सैनिक येथून येजा कतात.परंतु त्याना लोंढा,बेळगांव,हुबळी रेल्वेस्टेशनला जावे लागते.तेव्हा लांब पल्याच्या रेल्वेगाड्या खानापूर रेल्वे स्टेशनवर थांब्यात अशी शिफारस केली.
चोरट्यापासुन सुरक्षितता राहावी.यासाठी सीसीटीव्ही कॅमेरांची व्यवस्था करावी.स्वच्छता राखणे गरजेचे आहे.सफाई कामगाराची सोय करा.शौचालयाची सोय करा.गैरप्रकार टाळण्यासाठी एस्काॅर्टची सोय करा.पार्किंगची सोय करा. अशा विविध मागण्याच्या शिफारशी समितीने केल्या.
यावेळी अधिकार्यानी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.