
बेटी बचाव बेटी पढाव.चा नारा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
हळदी कुंकू समारंभ म्हणजे सौभाग्याचे लेणे असते . म्हणून हिंदू धर्मात
हळदी कुंकू कार्यक्रम हा मकरसंक्रांती पासुन ते रथसप्तमी पर्यंत फार पूर्वीपासून करतात या हळदी कुंकू कार्यक्रमाचे महत्व आमच्या हिंदु संस्कृती मध्ये अन्यन साधारण महत्त्व आहे, त्याच बरोबर मकरसंक्रांतीच्या सनाचे औचीत साधुन हा हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करत असतो.
असे विचार खानापूर तालुका अंगणवाडी संघटनेच्या पदाधिकारी व अंगणवाडी शिक्षिका मेघा मिठारी यानी हळदी कुंकू कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
लोंढा (ता.खानापूर )येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठापणा दिना निमित्त सर्वोदय स्वसहाय संघ,अरूणोदय स्वसहाय संघ,विजय ज्योती स्वयहाय संघ यांच्या सयुक्त विद्यामाने हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला.
यावेळी गावातील महिलानी पंतप्रधान मोदीनी सांगीतल्या प्रमाणे दिवे लावुन कार्यक्रम साजरा केला. तसेच बेटी बचाव बेटी पडाव हा नारा साजरा केला.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी संघातील सर्व महिलानी भाग घेतला होता.
यावेळी मेघा मिठारी,उर्मिला मिराशी, उर्मिला सावंत ,शांता खडोरे आदीनी विशेष परिश्रम घेतले.
तरी मंतूर्गे गावच्या ग्रामस्थ, पंच कमिटी व देव रवळनाथ मंदिर बांधकाम कमिटीने हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजीत करून नारीशक्तीचा मानसन्मान वाढवून तालुक्यात आदर्श निर्माण केलेला आहे.