
#शनिवारी महाप्रसादाचे आयोजन! तर रात्री “बिजली कडाडली ” नाट्य प्रयोग!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
लोंढा ( ता.खानापूर ) येथील श्री सिध्दीविनीयक यात्रोत्सव कमिटीच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही श्री सिध्दीविनायक मंदिरात गुरूवारी दि.३० ते शनिवारी दि १. फेब्रूवारी पर्यत श्री गणेश जयंती साजरी होत आहे.
गुरूवारी दि.३० रोजी सकाळी ७ वाजता श्री मुर्तीला अभिषेक, ११ वाजता श्रीची पालखीतुन मिरवणुक .शुक्रवारी दि.३१ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक , सकाळी १०.३० वाजता गणहोम. व सायंकाळी ७ वाजता डान्सस्पर्धा.
शनिवारी दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी अभिषेक ,त्यानंतर दुपारी १२ वाजता श्रीचा जन्मोत्सव तर दुपारी १.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ वाजता मान्यवराच्या उपस्थितीत सभा कार्यक्रम व श्रीफळांचा सवाल होणार आहे.
रात्री ९ वाजता बिजली कडाडली हा नाट्यप्रयोग होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला आमदार विठ्ठलराव हलेकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी गणेशभक्तानी महाप्रसादाला तसेच इतर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्ट कमिटी अध्यक्ष ,माजी जि.प. सदस्य बाबूराव देसाई व श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्ट कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.