
#शुक्रवारी रूमेवाडीच्या शेतकर्याच्या उसाला आग!
#शनिवारी कौंदलच्या शेतकर्याच्या गवत गंजीला आग! ५० हजार रू.नुकसान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
रूमेवाडी ( ता.खानापूर ) येथील चार शेतकर्यांच्या उसाच्या फडाला शुक्रवारी आग लागुन १०० टन ऊस जळुन खाक झाला. ही घटना ताजी असतानाच.
#कौंदल येथे गवंत गंजीली आग!
शनिवारी दि २५ जानेवारी रोजी भर दुपारी १२ कौंदल ( ता.खानापूर ) गावचे शेतकरी पोमाण्णा रूद्रापा पाटील यांच्या गावाजवळ असलेल्या ४ ते ५ ट्रक्टर गवंतसाठा असलेल्या गंजीला शाँर्टसर्किटमुळे आग लागुन जवळ पास ५० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले यानी दिलेली माहिती अशी की कौंदल गावाजवळ पोमाण्णा रूद्राप्पा पाटील यांच्या मालकीचे ४ ते ५ ट्रक्टर गवताचा साठा असलेल्या गवतगंजीला दुपारी १२ वाजता काही अंतरावर असलेल्या हेस्काॅम खात्याचा टी सी वरील तारामध्ये शाॅर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या पडल्या.लागलीच तेथील असलेल्या पालापाचाळ्याने पेट घेतला.भर दुपारी आग लागल्याने आग बघता बघता गंवत गंजीपर्यत जाऊन पोहचली व काहीवेळेतच गवंत गंजीने पेट घेतला. याची माहिती मिळताच ग्राम पंचायत सदस्य उदय भोसले यानी अग्नीशामक दलाला संपर्क करून माहिती दिली. बातमी समजताच गावच्या नागरीकानी आग विजविण्याचा प्रयत्न केला.परंतु भर दुपारी आगीने रूद्र आवतार धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही.लागलीच अग्नीशामक दलाच्या जवानानी आग अथक प्रयत्नाने विजविली.अन्यथा परिसरातील घराना तसेच इतर साहित्याना आग लागुन प्रचंड नुकसान झाले असते. शेतकरी पोमाण्णा रूद्रापा पाटील याच्या मालकीचे ४ ते ५ ट्रक्टर गवत जळाल्याने त्यांचे ५० हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
आग विझविण्यासाठी ग्राम पंचायतीचे सदस्य उदय भोसले,मारूती पाटील,आप्पाणा पाटील,यल्लापा पाटील,रामचंद्र पाटील, चेतन पाटील,दयानंद कोलेकर,बाळकृष्ण पाटील तसेच गावच्या शेतकर्यानी ,नागरीकानी आग विजविण्यासाठी प्रयत्न केले.
शासनाकडुन नुकसान ग्रस्थ शेतकर्याला नुकसान भरपाई मिळावी.अशी मागणी नागरीकातुन होत आहे.