
#खानापूरात हरिष रायका यांचे विविध मान्यवरांच्याहस्ते सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
राजस्थान राज्याच्या पाली जिल्ह्यातील ऊदरथल गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिष ओगडराम रायका यांची पशुपालक बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री लालसिंह जी यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय पशुपालन संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल खानापूर शहरासह खानापूर तालुक्यातुन अनेक मान्यवरांच्याहस्ते शाल,पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी मुळचे राजस्थानचे सध्या खानापूरात व्यवसायानिमित्त स्थायीक झालेले राजूसर किरण सोनार,इंद्रसिंह जगदिश भाई,आनंद भाई, नवाराम जिलू भाई, महेश भाई,लाखाराम श्रवण भाई आदीनी शाल ,पुष्पहार, पेढे भरून हरिष रायका यांचा सत्कार करण्यात आला.
हरिष रायका हे खानापूर तालुका भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.
गेल्या अनेक वर्षापासुन भाजप पक्षात ते कार्यरत असुन पक्षाच्या संघटनेसाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे खानापूर शहरासह तालुक्यातील नागरीकानी हरिष रायका यांचा सत्कार केेला.