
#उस वाहतुक टप्प! ५००० टन उस शेतात!
#शेतकरी अडचणीत लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील मणतुर्गा रेल्वे गेट अंडरपास बांधकामासाठी जानेवारी पासुन बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा अधिकार्यानी बजावला आहे.
मात्र मणतुर्गा रेल्वेगेटवरून याभागातील मणतुर्गा , शेडेगाळी,हारूरी, नेरसा ,अशोकनगर ,हेमाडगा,शिरोली आदी भागातील उसची वाहतुक होत असते.
सध्या याभागात जवळपास ५००० टन हुन अधिक उसाची वाहतूक शिल्लक आहे. जर मणतुर्गा रेल्वे गेट बंद झाले तर उस उत्पादक शेतकर्याचा ५००० टना हुन अधिक उस शेतात राहिल .आणि शेतकर्याना आर्थिक नुकसान सोसावे लागले.
तेव्हा खानापूर तालुक्यातील मणतुर्गा रेल्वे गेट पंधरा दिवस तरी बंद करू नये अशी मागणी याभागातील शेतकर्याची मागणी होत आहे.
तरी बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकिहोळी तसेच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी शेतकर्याच्या उसाची उचल होई तो पर्यत मणतुर्गा रेल्वेगेट सुरू ठेवण्यासाठी जिल्हा अधिकार्याना सुचना करावी.व शेतकर्याचे आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी शेतकरी शांताराम पाटील( मणतुर्गा) यांनी पत्रकाराशी बोलताना सांगीतले.