
#मान्यवरांच्याहस्ते सन्मान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी जांबोटी रोडवरील शुभम गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
संस्थेचे प्रसिडेंट एफ.एम. पाटील, व्हाईस प्रसिंडेट डाॅ.आर.हेरवाडेकर, सेक्रेटरी डाॅ.डी.ई.नाडगौडा,खजीनदार डाॅ.पी.एन. पाटील, संचालक अरविंद जोरापूरे, डाॅ. एन.एल. कदम, सुरज मोरे,नारायण चोपडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्या सौ दिव्या नाडगौडा यानी.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना समर्थ एज्यूकेशन सोसायटीचे सचीव डाॅ. डी.ई.नाडगौडा म्हणाले की, समर्थ इंग्लिश मिडीय स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनचा दिवस हा विद्यार्थ्या जीवनातील एक आनंदाचा दिवस आहे. एल के जी विद्यार्थ्या पासून इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यापर्यतच्या सर्व विद्यार्थ्यानी सांस्कृतीक भाग घेऊन आपल्या कला गुणांचे दर्शन घडविले. व आपल्या पालकाना परमोच्य आनंद दिला. पालकानी ही आपल्या पाल्याच्या कला गुणांचे कौतुक केले.यामागे समर्थ स्कूलच्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. समर्थ स्कूलचा खेळांडू यशवर्धन नाडगौडा याने बॅटमिटन स्पर्धेत राजस्तरीय स्पर्धेत यश मिळविले तर कुमारी अदिती अदिती नाडगौडा हिने राष्ट्रीयकराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले तसेच कुमारी प्रांजल हिने कराटे स्पर्धेत यश मिळविले व इतर खेळाडूनी यश मिळविल्याबदल खेळाडुचा मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.त्याचबरोबर दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यानी केलेल्या तब्बल तीन तास सांस्कृतीक कार्यक्रमाचा पालकांनी आनंद लुटला.
यावेळी विद्यार्थ्याचे ,शिक्षकाचे पालकांतुन कौतुक होत होते.
कार्यक्रमाला पालकानी ,विद्यार्थ्यानी तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
प्राचार्या सौ दीव्या नाडगौडा यानी स्कूलचा अहवाल वाचन केले.
यावेळी क्रिडा शिक्षक श्री तिरवीर यानी आभार मानले.