
#कांजळे गावचा पहिला सब इन्स्पेक्टर परशराम मुतगेकर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
कांजळे ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र परशराम मल्लाप्पा मुतगेकर हे ३५ वर्षाच्या पोलीस खात्याच्या सब इन्स्पेक्टर पदावरून ३१ जानेवरी रोजी निवृत्ती झाले.
परशराम मुतगेकर हे कांजळे या गावचे रहिवासी असून ते कांजळे गावातून सर्वात पहिले पोलिस खात्यातील नोकरीचे मानकरी ठरले होते. तसेच त्यांनी पोलीस पदावर भरती होऊन सब इन्स्पेक्टर पदापर्यंत बढती मिळवली व आपली सेवा बजावत असताना त्यांनी मंगळूर बेंगलोर व तामिळनाडू येथे वीरप्पणा ना पकडण्यासाठी जी कर्नाटक सरकारने यंत्रणा राबवली होती त्यामध्ये सुद्धा त्याने सतत दोन वर्षे सेवा बजावली व आत्ता बेळगाव येथे हिंडलगा ( ता. बेळगाव) येथील झेलमध्येही सेवा बजावून मच्छे ( ता.बेळगाव) येथील कर्नाटक पोलीस सेकंड बटालियन येथे सेवा बजावून आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले .
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त बटालियनचे कमांडर यांनी पोलिसांना मानवंदना देण्याचा आदेश देऊन त्यांचा बटालियन मार्फत सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांचे भाऊ विनायक मुतगेकर हे खानापूर तालुका ट्रिब्युनल मेंबर व ग्रामपंचायत युनियन संघटनेचे अध्यक्ष व निलावडे ग्राम पंचायत विद्यमान सदस्य हे त्यांचे भाऊ असून त्यांनी पण आपल्या संपूर्ण कुटुंबात मार्फत यांचा सत्कार करण्यात आला.