
#काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी, ग्रा.पं.सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, महांतेश राऊत यांचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
पारिश्वाड ( ता.खानापूर ) येथे सांडेल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त व त्यानिमित यात्रा उत्सव व रथोत्सव कार्यक्रम मंगळवारी दि. ४ रोजी मठाचे मठाधीश शिवलिंग गिरी महाराज यांच्या सानिध्याखाली व पंढरपूरचे प्रभू महाराज विठ्ठल महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर गाडी ,शहर अध्यक्ष महांतेश राऊत व खानापूर तालुका मेंबर व खानापूर तालुका ग्रामपंचायत यांच्या अध्यक्ष विनायक मुतगेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन प्रभू लिंगेश्वर महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने व डॉ. अंजली निंबाळकर खानापूरच्या माजी आमदार व एआयसीसीच्या प्रधानकारदर्शी यांच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पारिश्वाड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गौरव म्हणून दोन्ही अध्यक्षांनी मानधन दिले व बहिष्काळामध्ये खानापूर तालुका काँग्रेस पक्ष पारिषवाढ या भागाचा विकास करण्यासाठी धार्मिक सामाजिक इत्यादी उपक्रमांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी महिलांना उद्देशून बोलताना अँड.घाडी म्हणाले की, पाच गॅरंटी बद्दल काँग्रेस पक्षाने चालवलेल्या दीनदलित गोरगरीब महिलेना त्याचा भरपूर फायदा होत आहे याची जाणीव ठेवून या भागातील जनतेने काँग्रेस पक्षाच्या पाठीशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार त्याचप्रमाणे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या प्रयत्नातून तालुक्याचा विकास साधणार असल्याचे सांगितले.