
#मासुरात लक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ!
#आमदार यू.बी.बनकार यांची उपस्थिती !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात फेब्रुवारी महिण्या पासुन राज्याच्या अनेक जिल्ह्यात ग्रामदैवता लक्ष्मी देवीच्या यांत्राना लगबग सुरू झाली आहे.
मासुर ( ता.हिरेकरूर ) गावची ग्राम देवता लक्ष्मी यात्रेला मंगळवारी दि.४ पासुन सुरू प्रारंभ झाला.
यात्रेची सुरूवात मंगळवारी सायंकाळी लक्ष्मी देवीच्या रथोत्सवापासुन झाली. सायंकाळी ४ वाजता गावच्या ग्राम पंचायत कार्यालजवळील लक्ष्मी मंदिराच्या आवारात पंच मंडळी व मानकर्याच्या उपस्थितीत विधीवत पुजा होऊन कार्यक्रमाला सुरूवात झाली.
तालुक्याचे आमदार यू बी बनकार यावेळी उपस्थित होते.यावेळी आमदाराचा यू बी बनकार यांचासत्कार करण्यात आला.
मासुरू येथील रथोत्सवाला सायंकाळी सुरूवात झाली विधीवत पुजा होऊन ढोल ताशाच्या व डिझेच्या तालावर भाविकानी उदो गे उदोच्या नादात सुरूवात झाली.
मासुर गावातुन सुरूवात होऊन गावच्या विविध ठिकाणाहुन रथोत्सव साजर होत होता.
मंगळवारी तब्बल चार तास रथोत्सव मिरवुणुकीला वेळ लागला.रात्री उशीरा गावापासुन तीन किले मीटर असलेल्या दुर्गादेवी मंदिराजवळ रथोत्सव मिरवणुकीची सांगता झाली. या ठिकाणी मंगळवारी दि.१२ पर्यत ही जत्रा चालणार आहे.