
#आमदारांचे प्रयत्न,बीजेपी माजी सेक्रेटरी गजानन पाटील यांचा पुढाकार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा ( ता. खानापूर ) येथील सरकारी मराठी शाळेच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रयत्नाने तालुका पंचायतीच्या अनुदानातुन ३ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला.
मणतुर्गा शाळेच्या इमारतीचे छप्पर मोडकळीस आले आहे. तसेच विद्यार्थ्याना बसण्यासाठी फर्शीची नितात गरज आहे. यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी तालुका पंचायतीच्या फंडातुन ३ लाख रूपयाच्या विकास कामाची तरतुद करण्यात आली.
सदर काम तालुका बीजेपी माजी सेक्रेटरी गजानन पाटील हे करणार असुन लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.
मणतुर्गा सरकारी मराठी शाळेच्या इमारतीचे छप्पर मोडकळीस आले आहे. त्यासाठी पत्रे घालण्यात येणार असुन तसेच शाळेसाठी फर्शी बसविण्यात येणार आहे.