
#निमित्त श्रीदेवरवळनाथ मंदिर जिर्णोध्दार!
संदेश क्रांती न्यूज :
मणतुर्गा ( ता.खानापूर ) येथील पांडुरंग सप्ताह उत्सवानिमित्त व श्रीदेवरवळनाथ मंदिर जिर्णोध्दाराचे औचित्य साधुन रविवारी दि. ९ रोजी दुपारी ३ वाजता माहेर वासिनीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वतनदार सौ अंकिता राजाराम पाटील उपस्थित राहणार आहेत.
स्वागताध्यक्षा सौ चैत्रा पाटील राहणार आहेत.विविध देवदेवतांचे पुजन सौ.रूक्मिणी पाटील,सौ लक्ष्मी गुरव,सौ.स्नेहल पाटील ,सौ.रूतुजा पाटील सौ.वैभवी देसाई यांच्याहस्ते होणार आहे.तर दीपप्रज्वलन सौ.लक्ष्मी गुरव माजी ग्राम पंचायत उपाध्याक्षा,सौ.शारदा देवलतकर संचालिका पी के पी एस,सौ.सुमित्रा बोबाटे,सौ सुमित्रा देसाई,सौ.अंकिता देवकरी,सौ.विजयालक्ष्मी पाटील,सौ.सुप्रिया गुंडपिकर,सौ.सुवर्णा देसाई,सौ .भारती बोबाटे,सौ.भाग्यश्री देसाई,सौ प्रभावती गुडपिकर,सौ प्रणोती पेडणेकर यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून सौ सुषमा शेलार साॅफ्टवेअर इंजिनिअर याउपस्थित राहणार आहेत.
सध्या श्री पांडुरंग अंखड नाम सप्ताहाल सुरूवात झाली असुन रविवारी दि.९ पर्यत सप्ताह चालु राहणार आहे.
रविवारी दि ९ रोजी पहाटे काकड आरती होऊन सकाळी ९ वाजता महाआरती त्यानंतर पालखी सोहळा होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या!
निवृत्त मुख्याध्यापिका सौ.अरूंधती दळवी
.रू १११११,सौ.शांताबाई शांताराम पाटील रू ५४५१ ,श्रीमती पार्वती भटवाडकर रू.५१५१ , सौ साधना शेलार रू ५०३१रू.सौ.अश्विनी गुडपिकर रू.५००१ ,सौ सुजाता देवकरी रू.५००१,सौ.कोमल देवकरी रू ५००१ याशिवाय शेकडो महिलानी देणग्या देऊ केल्या आहेत.