
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील समर्थ इंग्रजी माध्यम स्कूलला बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरोमठ यानी नुकताच धावती भेट दिली.
यावेळी समर्थ इंग्रजी शिक्षण संस्थेचे सचीव व खानापूर तालुका डाॅक्टर असोसीएशन अध्यक्ष डाॅ.डी.ई.नाडगौडा यानी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ यांचे पूष्पगुच्छ देऊन स्वागत केेले.
यावेळी प्राचार्या सौ दीव्या नाडगौडा यानी समर्थ इंग्रजी स्कूलच्या प्रगती बद्दल माहिती दिली. व इतर विषयाबद्दल चर्चा केली.
यावेळी जिल्हाशिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ यानी समर्थ इंग्रजी स्कूलच्या इमारतीची पाहणी केली. स्कुलच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी खानापूरचे प्रभारी बीईओ ए.आर.अंबगी ,एस.एन.कम्मार तसेच सह शिक्षक सचिन गुरव उपस्थित होते.