
#माजी आम. व एआयसीसी सचिव डाॅ.अंजली निंबाळकर यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाच्या वतीने तालुका नवीन युथ काॅग्रेस अध्यक्षाचा सत्कार सोहळा तसेच खानापूर तालुका आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्यांचा काॅग्रेस पक्षात प्रवेश त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा असा सयुंक्त कार्यक्रम मंगळवारी दि. ११ फेब्रुवारी रोजी खानापूर येथील शिवस्मारक चौकातील माजी आमदार व्ही.वाय.चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी माजी आमदार व एआयसीसी सचीव डाॅ.अंजली निंबाळकर तसेच काॅग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी खानापूर तालुका आजी माजी पदाधिकार्यानी व सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.