
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर येथील दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्यांचा चापगाव ग्रामस्थांच्या वतीने व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने फोडेश्वर मंदिरात जाहीर सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती अमृत महादेव शेलार, विजय देवाप्पा गुरव ,मेघशाम ज्योतिबा घाडी यां सर्वांचा सत्कार करण्यात आला .
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व पंच कमिटीचे अध्यक्ष नारायण सिद्धाप्पा गोदी होते. उपस्थित चापगाव गावचे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले, केचाप्पा बेळगावकर ,मुकुंद पाटील ,मष्णू चोपडे, कृषी पतींचे अध्यक्ष उदय पाटील, सदस्य पांडुरंग पाटील, जय देव अंबाजी, बाबू घारशी ,महादेव धबाले ,निंगाप्पा गोदी, रुद्राप्पा अंगडी, बळीराम धबाले, विलास धबाले , नारायण बेळगावकर ,शंकर मारिहाळ, महाबळेश्वर घारशी ,परशराम येळगुळकर ,रामा जीवाई ,सोमनिंग धबाले, संतोष जीवाई ,मष्णू बिरजे ,व्यंकट सुळगेकर, भाऊ पाटील, मशनु गुरव, बाळू गुरव ,नागो धबाले, नागो मादार गावातील ग्रामस्थ उपस्थित होते