
#शहराच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर नगरपंचायतीच्या नुतन नगराध्यक्षा पदी नगरसेविका सौ. मिनाक्षी प्रकाश बैलुरकर याची बीन विरोध निवड झाली.
यानिमित्त आमदार व माजी पालक मंत्री रमेश जारकिहोळी यांची नुतन नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी प्रकाश बैलुरकर यानी आपले पती माजी स्थायी कमिटी अध्यक्ष व विद्यामान नगरसेवक प्रकाश बैलुरकर यांच्या समवेत बेळगाव भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी आमदार रमेश जारकिहोळी याच्याशी चर्चा करून खानापूर शहरातील विविध विकास कामाविषयी चर्चा करण्यात आली.
खानापूर शहराच्या विकास कामासाठी आमदार नात्याने मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन.अशी ग्वाही आमदार रमेश जारकिहोळी यानी दिली.
यावेळी खानापूर नगरपंचायतीचे माजी स्थायी कमिटी अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश बैलुरकर, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक मझहर खानापूरी, नगरसेवक आपय्या कोडोळी ,रफिक वारेमनी,नगरसेविका शोभा गावडे, राजश्री तोपिनकट्टी,भााजपा तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी आदी उपस्थित होते.