
#जिल्हाधिकार्यानी काढला आदेश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता. खानापूर ) येथे गेल्या २४ वर्षानंतर गावची ग्राम देवता श्री महा लक्ष्मीदेवीची यात्रा बुधवारी दि.१२ ते दि.२३ फेब्रुवारी याकालावधीत होत आहे. त्यानिमित्त नंदगड गावच्या हद्दीत यात्राकाळात शांतता व कायद्या सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा अधिकारी महम्मद रोशन यानी आदेश बजावला आहे.
या आदेशानुसार दि.११ फेब्रुवारी रात्री ८ वाजल्यापासुन ते दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेपर्यत नंदगड ग्राम पंचायत हद्दीतील दारू दुकाने ,बार,मध्ये सक्त दारू विक्रीची बंदी घालण्यात आली आहे.
कायद्याचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीना कर्नाटक उत्पादक शुल्क कायदा १९६५ च्या कलम ३२ अंतर्गत शिक्षा केली जाईल .असा आदेश देण्यात आला आहे.