#अँड.ईश्वर घाडी यांचे सपत्नीक कुंभमेळाव्याला प्रयाण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खानापूर वकील संघटनेचे अध्यक्षअँड.ईश्वर घाडी हे सपत्नीक कुंभमेळावा,प्रयाग,वारणासी,काशी आदी ठिकाणी जात आहे. यानिमित्त खानापूर वकील संघटनेच्यावतीने अँड.ईश्वर घाडी यांचा सपत्नीक सत्कार गुरूवारी दि. १३ रोजी सकाळी 11 वाजता वकील संघटनेच्या सभागृहामध्ये शाल श्रीफळ व फेटा बांधुन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी खानापूरचे ज्येष्ठ वकील पी एन बाळेकुंद्री, अँड एस एन लोटुलकर, अँड. लोकरे ,अँड सुरेश भोसले , अँड.बी.डी पाटील ,अँड. नंदकुमार पाटील ज्येष्ठ वकील आर्यन पाटील त्याचप्रमाणे इतर वकील जी जी पाटील उपस्थित होते.
यावेली कुंभ मेळ्याचा उद्देश जेष्ठ वकील सादिक नंदगड यांनी सांगितला.
यावेळी त्यांना त्यांचा प्रवास सुखकर व्हावे व खानापूर साठी कुंभमेळ्यातून चांगली ऊर्जा घेऊन यावे .अशी त्यांना सदिच्छा दिली. यावेळी अँड.ईश्वर घाडी यानी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आभार अँड.अनिल लोकरे यानी मानले.