#दोन म्हशी गंभीर जखमी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पणजी बेळगाव महामार्गावरील काटगाळी क्राॅसवरील हाडफॅक्टरीजवळ पोलिस खात्याच्या इनोवा कारने महामार्गावर आडव्या आलेल्या दोन म्हशीना जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असुन पोलिस खात्याच्या इनोना कारचा दर्शनी बाजू चक्काचूर झाला आहे.
हा आपघात शुक्रवारी दि.१४ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास झाला असुन सदर आपघातातील दोन म्हशी पैकी एक म्हैस जगण्याची शक्यता कमी आहे.
सदर म्हशी देसुर येथील कमलनगरचे शेतकरी दुर्गाप्पा शिवाप्पा कोरवी यांच्या मालकीच्या असल्याचे समजते.