
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता. खानापूर ) गावच्या ग्रामदेवता श्रीमहालक्ष्मी देवीच्या यात्रोला उत्साहात प्रारंभ झाला आहे. पहिल्य दिवसापासुन श्रीमहालक्ष्मी देवीच्या मिरवणुकीला मोठ्या उत्साहात आणि भंडार्याची उधळण करत ढोल ताशाच्या गजरात सुरूवात झाली आहे.
शनिवारी श्रीमहालक्ष्मी देवीची मिरवणूक सवाल झालेल्या ठिकाणापासुन कुरणे गल्ली ,गणपतगल्ली,सानिकोप ,पोस्टमुगळ व इतर गल्लीतुन मिरवणु काढण्यात आली.
यावेळी प्रत्येक गल्लीतील मोठ्या उत्साहात महिलानी देवीची ओटी भरल्या.
यावेळी दिवसभर प्रत्येक घरातुन ओट्या स्विकारण्यात येत होत्या. मिरवणुक लक्ष्मीदेवीच्या रथाकडे पोहोचणार आहे.